धुळेकरांच्या मतांची बोली लावणाऱ्या भाजपला निवडणुकीत त्यांची जागा दाखवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । धुळे

डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या धुळे मनपा निवडणुकीसाठी सध्या दलबदलू संधीसाधू उमेदवारांचे इनकमिंग भाजपमध्ये जोरात सुरू आहे. आम्ही तुमचा खर्च करू, तुम्हाला एका प्रभागासाठी 15 ते 20 लाखांची मदत देऊ, एका मतासाठी पाच हजार रुपये मताची किंमत मोजू अशी आश्वासने दिली जात असून धुळेकरांच्या मतांची बोली लावणाऱया भारतीय जनता पक्षाला त्यांच्या उमेदवारांना धुळेकरांनी त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

शिवसेना आझादनगर विभाग शिवसैनिक व पदाधिकाऱयांचा मेळावा शांतीनगर, अभय कॉलेज परिसर येथे संपन्न झाला. या मेळाव्याला शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

धुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून समितीचे सदस्य धीरज पाटील यांच्या विशेष निधीतून शांतीनगर येथील मोकळय़ा जागेत वॉल कंपाऊंड कामाचे लोकार्पणदेखील याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री दादा भुसे तर प्रमुख पाहुणे म्हणून सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, उपजिल्हाप्रमुख