
सामना प्रतिनिधी । नगर
नगर शहरातील झेंडीगेट परिसरात छापा टाकून पोलिसांनी सहा टन गोमांस जप्त करून, 10 जणांना अटक केली आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक पूनम पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रविवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.
झेंडीगेट परिसरात मोठा कत्तलखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री या ठिकाणी छापा टाकला. तेथून गोवंश जनावरांचे तब्बल सहा टन मांस, तूटलेले अवयव व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. या कत्तलखान्यातून 10 जणांना अटक करण्यात आली.
























































