जायकवाडी विरोधात आंदोलन तीव्र करणार, प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नगर

जायकवाडी धरणातील विसर्ग करण्याचा निर्णय बदलला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आमदार बच्चु कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे. एक पत्रक जाहीर करून त्यांनी हा इशारा दिला आहे.

नगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळंवडे, दारणा, गंगापूर, पानखेड या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. पाण्याचा विसर्ग किती प्रमाणात करण्यात येणार, याबाबतही सरकारने काहीही खुलासा केलेला नाही. याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाने त्यानंतर राज्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयात लेखी निवेदनही दिलं होतं. मात्र, त्याला कोणतंच उत्तर मिळालेलं नाही.

त्यामुळे जायकवाडी धरणात किती विसर्ग करण्यात येणार आहे, खुलासा करावा आणि पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय त्वरित थांबवावा, या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे.

summary- prahaar janshakti party warns about jayakwadi