
>> प्रो. डॉ. शशिकांत लोखंडे
ग्रीक महाकाव्ये महाकवी होमरकृत इलियड व ओडिसी हा 362 पृष्ठांचा स्मिता कापसे यांचा ग्रंथ. ‘अर्थात इंग्रजी भाषेच्या अपुऱया ज्ञानामुळे इंग्रजी ग्रंथांचे आकलन मला मर्यादित प्रमाणात झाले आहे.’ हे मान्य करून लेखिकेने पूर्वोपलब्ध ग्रंथांच्या आधारे या दोन ग्रीक महाकाव्यांचा आशयाच्या अंगाने परिचय करून दिला आहे. मराठीत संख्येने याविषयी फारसे ग्रंथ दिसत नाहीत. इंग्रजी, बंगाली, तामीळ भाषांमध्ये होमरच्या या महाकाव्यांचे अनुवाद आहेत.
सदर ग्रंथात लेखिकेने 11 प्रकरणे, 40 उपप्रकरणे व 5 परिशिष्टय़े अशी रचना केली आहे. वाङमयीनदृष्टय़ा या महाकाव्यांचे मूल्यमापन करणे किंवा त्यांचे वाङमयीन सौंदर्य शोधणे हा येथे हेतू नाही.प्रस्तुत महाकाव्यांची मूळ कथाबीजे प्राचीन ग्रीक परंपरेतील आहेत. लोककथा व पुराणकथा यांच्या समन्वयातून एक ऐतिहासिक वीरगाथा या दोन्ही महाकाव्यांत आहेत. प्रसिद्ध ट्रोजन युद्ध हा महाकाव्यांचा वर्ण्यविषय आहे. बायबलनंतर सर्वात लोकप्रिय आहे ते ‘इलियड’ आणि ‘ओडिसी’. इलियड हा यवनांचा पवित्र धर्मग्रंथ त्या काळात होता. दोन्ही काव्यांत कथासूत्र व शैली यांची एकात्मता आहे. इ. स. पू. 6 व्या शतकात अथेन्सचा शासक पिस्टीस्टाटसने हे महाकाव्य लिपीबद्ध केले. इलियड म्युझ – देवीचा वाणी आहे. त्यातून शौर्य व साहस यांची प्रेरणा मिळते. या महाकाव्याचे कथानक फारच छोटे आहे. वस्तुतः ट्राय उद्ध्वस्त होण्यापूर्वी नंतरचे ट्रॉय – यातील घटना अफाट आहेत. पण होमरने इलियडमध्ये एकिलीजच्या गणेशापासून ते त्याच्या युद्धविरामाने यवनांचा पराजय होईपर्यंत आणि त्यानंतर एकिलिजचा साथी पेद्रोक्लसचा हेकटरच्या हाताने वध होईपर्यंतचा व त्याचा वयोवृद्ध पित्याने – राजा प्रामेयने ते शव ट्राय नगरात आणेपर्यंतचाच कथा भाग निवडला आहे, तेही 24 अध्याय आणि 15693 पदांमध्ये. हे युद्धकाव्य असूनही त्याच्या स्रोत करून रसात आहे. मानवी जीवनातील नियतीचे खेळ त्यात चित्रित आहेत. दोन्ही महाकाव्यांत कुठेही बोध वा उपदेश नाही. या युद्धामागे प्रेमाची प्रेरणा व आंच आहे. पॅरिस आणि हेलन यांचे अवांछित प्रेम हीच महाकाव्याची प्रेरणा आहे. एकिलीजचा क्रोध कसा प्रेमात रूपांतरित होतो याचेच दर्शन त्यात आहे.
‘इलियड’मध्ये जो समाज आहे तो राजांचा व सामंतांचा. त्यात शेष सामान्यजनांचा मागमूसही नाही. हे युद्ध एका स्त्र्ााrसाठी लढले गेले. स्पार्टाचा राजा मेनिलेयसची पत्नी अपूर्व सुंदरी हेलन हिच्यासाठी हे युद्ध लढले गेले. ‘इलियड’चा उत्तरार्थ ‘ओडिसी’ आहे. ‘ओडिसी’ हा मानवाने उैर्जेचा संवाहक ग्रंथ आहे. या ऊर्जेचे प्रतिनिधित्व ओडिसियस करतो. अविचल साहस, उद्दाम उत्साह, अपरिचित जिज्ञासा यांनी भारित झालेला हा योद्धा आहे. ट्राय युद्धातून या योद्धय़ाच्या घरी परतण्यापर्यंतच्या स्थितीचा कथाभाग यात आहे.
स्मिता कापसे यांनी वस्तुनिष्ठsने पूर्वोपलब्ध माहितीचा तपशील या ग्रंथात सादर केला आहे. जेस्पर ग्रिफित यांच्या होमर – दि इलियड (अस्टुडण्टगाईड) हा ग्रंथ आणि जेस्प ग्रिफिनचा ग्रंथ लेखिकेने आधाराला घेऊनही त्यांचा मराठी अनुवाद नेमका वाचकांसमोर ठेवलेला दिसत नाही. इंग्रजी रूप असलेली व अनर्थपूर्ण वाक्ये सर्वच या ग्रंथात दिसतात. पूर्वोपलब्ध ग्रंथांतील माहितीचे संकलन करून महाकाव्यांचा निवळ परिचय करून देणे फारसे कठीण नसले तरीही त्यांची सांधेजोड अचूक करणे हे कौशल्याचे काम लेखिकेने चांगले केले आहे. अनेक उपकथानके, अगणित देवता, शेकडो वीर, प्राणी-पक्षी आणि त्यांचे वास्तव व अद्भुत मेलन हा मुळातच गच्च तपशील आहे. त्याचे दर्शन लेखिकेने अचूकपणे घडविले आहे. मुळात मराठीत अशा अभ्यासाचे संकलनाचे ग्रंथ अभवात्मक दिसतात. या पार्श्वभूमीवर स्मिता कापसे यांचे हे लेखन मौलिक ठरते…
ग्रीक महाकाव्ये
महाकवी होमरकृत इलियड व ओडिसी
लेखिका : स्मिता कापसे
प्रकाशन : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे : 362
मूल्य : 400/-




























































