
सामना ऑनलाईन । मुंबई
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 2.O या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रजनीकांत यांच्या रोबोट या चित्रपटाचं हे पुढचं व्हर्जन वाटावं असा या ट्रेलरचा थाट आहे. रजनीकांत यांच्यासोबत अभिनेता अक्षय कुमारही या चित्रपटात एका सायफाय भूमिकेत दिसतोय. ट्रेलर सुरू होतो तो तंत्रज्ञानाचा वापर दाखवत. पण, अचानक देशभरातले मोबाईल उडून नाहीसे होऊ लागतात आणि एक वेगळंच युद्ध छेडलं जातं. त्या युद्धात लढण्यासाठी ज्या चिट्टी या रोबोची मदत घेतली जाते, त्या रोबोचं व्हर्जन म्हणजे ‘2.O’.
आता हा सायफाय चित्रपट असल्याने इथे ग्राफिक्सना पूर्ण वाव देण्यात आला आहे. रोबोटमध्ये आपलं वेगळेपण दाखवून देणारे थलैवा रजनीकांत या चित्रपटातही दिसताहेत. अक्षय कुमारची भूमिका नकारात्मक आहे. त्यामुळे हा चित्रपट नेमका काय आहे, याची उत्सुकता ताणली गेली आहे.
पाहा ट्रेलर-





























































