
सामना ऑनलाईन, न्यूयॉर्क
न्यूयॉर्कमधल्या रायकर्स आयलँड भागातील एका तुरुंगातील हा व्हिडीओ असून रिकीम पार्कर नावाच्या कैद्याने पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्यै कैद झाला आहे. रिकीमला छळ करणे आणि त्रास देणे या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तुरुंगामध्ये दाखल होताच काही तासात त्याने ही मारहाण केली आहे. मारहाणीचं कारण काय हे मात्र कळू शकलेलं नाही.





























































