
सामना प्रतिनिधी । जाफराबाद
जालना जिल्ह्यातील जाफराबादेत भाऊबिजेच्या रात्री चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून भरवस्तीतील चार दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. शरटच्या दोन्ही कुलूपा शाबीत ठेवून शटर उचकटून चोरीचा शहरातील पहिलाच प्रकार असल्याने व्यापारी वर्गात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. एकाच रात्री चार चोऱ्या झाल्याने पोलीसही हडबडले आहेत.
दरम्यान ९ नोव्हेंबर रोजी भाऊबिजेच्या रात्री दुर्गा चौकातील बाबा किराणा यांचे मुख्य रस्त्यावरील किरणा दुकान चोरट्यांनी फोडले. दुकानाचे शटरच्या दोन्ही कुलूपा आहे तशाच ठेवून लोखंडी अवजाराने शटर उचकटून दुकानात प्रवेश करुन दुकानातील नगदी रोख रक्कम व किरणा वस्तु असा एकूण ६०ते ७० हजारांचा ऐवज चोरुन नेला. सकाळी दुकान उघडताच हा प्रकार लक्षात आला. याच रात्री शहरातील बालाजी ज्वेलर्स, भोसले मेडिकल व स्वस्तिक हर्बल या दुकानात चोरट्यांनी डल्ला मारला. या तिनही ठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरा असतांना स्वस्तिक हर्बल या दुकानातील ४ कॅमेरे व मशीनच चोरट्यांनी लांबविली.
सर्व दुकाने भरवस्तीत असून शटर लावलेली आहे. तरी चोरट्यांनी कुलूप तोडून, शहरट उचकटून चोरी केली. हा प्रकार रात्री ३ वाजेच्या नंतर झाल्याचे प्राथमिक चर्चेत आहे. पोलीसांच्या थोडा ही वचक चोरट्यांवर नसल्याचे या घटनेतून चर्चील्या जात आहे. बॉक्समध्ये घेणे शहरातील भरवस्तीत झालेल्या चार दुकानातील या चोऱ्यामुळे व्यापारी वर्ग घाबरला आहे. या वर्षी प्रचंड दुष्काळ असून पुढील काळात अशा चोऱ्यांमध्ये वाढ होणार असल्याने व्यापारी वर्गांनी पोलीसांना धारेवर धरले आहे. पोलीसांनी शहरातील रात्रीची गस्त वाढवून झालेल्या चोरट्यांचा तपास लावावा, अशी व्यापारी वर्गाकडून मागणी जोर धरत आहे.

































































