कर्मचाऱ्यांच्या सावधानतेमुळे राज्यराणी एक्स्प्रेसचा अपघात टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मनमाड

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सावधानतेमुमुळे मनमाड मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसचा अपघात टळला. ही घटना गुरुवारी पहाटे रापली गेटजवळ घडली. मनमाड लासलगाव लोहमार्गावर मनमाडजवळ असलेल्या रापली गेटजवळ लोहमार्गाला मोठा तडा गेला. ही बाब ट्रक तपासणी करणाऱ्या रेल्वे कामगारांच्या लक्षात आली.

त्यावेळी मनमाड मुंबई राज्यराणी मनमाडमधून निघाली होती. परंतु घटनेपासून काही अंतरावर ती थांबविण्यात आली. कामगारांच्या सावधानतेमुळे संभाव्य अपघात टळला. ट्रकमन चेतन आहिरे व काशीनाथ ठाकरे यांनी प्रसंगावधान राखत राज्यराणीच्या ड्रायव्हरला ट्रक पेट्रोलिंगच्या दरम्यान सावध केले. त्यामुळे मोठा अपघात टळला.

summary- employee save rajya rani express