सहा हजार वर्षापूर्वीच्या मांजरीचे ममीज सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। काहीरा

इजिप्तमधील काहीरा येथे थडग्यात तब्बल सहा हजार वर्षापूर्वीच्या अर्धा डझनभर मांजरीचे ममीज सापडले आहेत. हा एक ऐतिहासिक शोध असल्याचे बोलले जात आहे. काहीरातील सक्कारा येथील एका पिरॅमिडच्या कॉम्प्लेक्समध्ये मांजरीचे हे अवशेष सापडले आहेत. इजिप्तच्या पुरातत्वविभागातर्फे हे संशोधन करण्यात आले होते.

cat-mummy

या संशोधनास एप्रिल महिन्यापासून सुरुवात झाली होती. यात उत्खननात तीन मोठी थडगी सापडली. यातील मांजरी दुर्मिळ असून त्यांच्या प्रजातींवर आता संशोधन केले जाणार आहे.

mummys

शोधकांनी दिलेल्या माहितीनुसार प्राचीनकाळी इजिप्तमध्ये मांजरींना विशेष महत्त्व होते. मांजरींचा संबंध थेट धर्माशी जोडला गेला असल्याने इजिप्तमध्ये काही ठिकाणी मांजरांची पूजाही केली जाते. तसेच गाय आणि सिंह यांची शिल्पही येथे सापडली आहेत.