प्रभू रामचंद्रांना वाटेल तेव्हाच अयोध्येत मंदिर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, वाराणसी

अयोध्येत तातडीने राममंदिर उभे राहावे अशी देशभर जनभावना असली तरी त्याला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी छेद दिला आहे. प्रभू रामाला जेव्हा वाटेल तेव्हा अयोध्येत राममंदिर उभे राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

भाजपने राममंदिराबाबतची आपली भूमिका संकल्पपत्रात मांडली आहे. प्रत्येक काम हे देवाच्या इच्छेवरच चालते. त्यामुळे प्रभू रामाची इच्छा होइल तेव्हा नक्की राममंदिर उभे राहील. तसेच ते उभे राहण्यास फारसा वेळही लागणार नाही, असे मत शर्मा यांनी व्यक्त केले. उत्तर प्रदेशच्या सहकारमंत्र्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. आपला देश हा श्रद्धा आणि धर्माच्या आधारावर चालला आहे, असेही त्यांनी सांगितले.

summary- dinesh sharma speaks about ram mandir