दिवसाला 2 हजार शेतकऱ्यांचा शेतीला रामराम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
जगातील 85 टक्के लोक दुष्काळी भागात राहतात

सामना प्रतिनिधी । पुणे

लहरी हवामान, अवकाळी पाऊस, दुष्काळाने करपलेली जमीन याला वैतागून दिवसाला तब्बल 2 हजार शेतकरी शेतीला रामराम ठोकत असल्याची धक्कादायक माहिती ज्येष्ठ पत्रकार आणि शेतकऱयांच्या प्रश्नांचे अभ्यासक पी. साईनाथ यांनी दिली. पुण्यात आज बुधवारी झालेल्या शेतकऱयांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

शेतकऱयांच्या आत्महत्यांचे सत्र वाढले आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यामुळे आणि सावकारी पाशात अडकल्यामुळे शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे वास्तव त्यांनी यावेळी मांडले. शेती हळूहळू कॉर्पोरेट विळख्यात अडकू लागल्याने कृषिप्रधान म्हटल्या जाणाऱया हिंदुस्थानात शेतकऱयांचे जगणे अत्यंत मुश्कील बनल्याचे पी. साईनाथ म्हणाले. देशातील शेतकऱयांची संख्या वेगाने कमी होत असून आता शेतकरीवर्ग शहराकडे वळू लागल्याचे त्यांनी सांगितले.