
सामना प्रतिनिधी । मालवण
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मालवण शिवसेनेच्या वतीने शहर शिवसेना कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, तालुकाप्रमुख जिल्हा परीषद सदस्य हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेविका सुनीता जाधव, अंजना सामंत, दीपा शिंदे, किसन मांजरेकर, रवी तळाशीलकर, संमेश परब, अमोल वस्त व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
































































