माणगावमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; २५ जणांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माणगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर माणगाव पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. मौजे ढालघर गावच्या हद्दीत, हॉटेल कार्तिकसमोर असलेल्या नारायण शेठ यांच्या इमारतीत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रोख रक्कम, मोबाईल फोन, जुगाराचे साहित्य आणि वाहने असा एकूण सुमारे २० लाख ७० हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

माणगाव पोलिसांना अड्ड्यासंर्भात माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य, मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच घटनास्थळी असलेली वाहने जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २० लाख ७० हजार रुपये आहे. या प्रकरणात एकूण २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.