
सामना प्रतिनिधी । गुहागर
देवरुख शहरात गुरुवारी सकाळी 7.29 च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. दोन दिवस वातावरणात झालेला बदल, अवकाळी पाऊस यामुळे निसर्गचक्र बिघडलेले असतानाच सकाळी हा भूकंपाचा सौम्य धक्का नागरिकांना जाणवला.
विशेषतः अपार्टमेंटमधील नागरिकांनी हा भूकंपाचा धक्का अनुभवला. देवरुख परिसरात वारंवार होणारे भूकंप यामुळे देवरुख हा भूकंपाचा केंद्रबिंदु झाला आहे की काय अशी भीती व्यक्त होत आहे.


























































