जेव्हा ब्लँकेटपायी जम्मू तावी एक्प्रेस खोळंबते…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईची लाइफलाइन लोकल नेमक्या कोणत्या कारणांनी रखडेल याचा काही नेम नाही. वांद्रे टर्मिनसहून सुटलेल्या जम्मू तावी एक्स्प्रेसला ‘सुरक्षा साखळी’ खेचून वारंवार रोखण्यात आले. परंतु हा प्रकार कोणा प्रवाशाने केला नसून रेल्वेच्याच कोच अटेंडंटकडून घडला आहे. जम्मू तावी एक्स्प्रेसच्या एसी डब्यात चादरी व ब्लँकेट चढविण्यास हा रेल्वे कर्मचारी विसरल्याने त्याचा फटका सकाळी ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेला बसला. या प्रकरणात कोच अटेंडंटवर आरपीएफने गुन्हा दाखल केला आहे.

पश्चिम रेल्वेवर गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे वांद्रे टर्मिनसहून जम्मू तावी एक्स्प्रेस सुटली असता हा विचित्र प्रकार घडला. वांद्रे टर्मिनस ते जम्मू तावी एक्स्प्रेसच्या बी-5 डब्यातील चादरी व इतर सामान भरण्यासाठी कमी वेळ मिळाल्याने कोच अटेंडंटने गाडीची सुरक्षा चेन वारंवार खेचल्याचे उघड झाले. सकाळी सातच्या सुमारास सुटलेल्या गाडीतील एसी डब्यात चादरी आणि अन्य सामान भरण्यात उशीर झाल्याने तेजपाल सिंह या डब्यातील सहाय्यकाने आपत्कालीन साखळी खेचली.