‘खाउजा’ धोरणाचा मोदी उद्दाम चेहरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘खाऊजा’ म्हणजे खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या धोरणाचा उद्दाम चेहरा आहेत, असे सांगतानाच येत्या ‘थर्टी फर्स्ट’ला जुन्या वर्षापाठोपाठ भाजप सरकारलाही निरोप द्या, असे आवाहन मुंबईतील एका परिषदेत करण्यात आले.

रविवारी प्रभादेवी येथील भूपेश गुप्ता भवनात ‘सरकार विरुद्ध सर्व समाज परिषद’ पार पडली. त्यात येत्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला हटवण्याचा निर्धार अनेक समाजांतील नेत्यांनी एकमुखाने व्यक्त केला, असे ‘लोकांचे दोस्त’ या संघटनेचे नेते रवी भिलाणे यांनी सांगितले.

मोदी सरकारच्या राजवटीत 2016-17 या एकाच वर्षात 1 टक्का लोकांच्या संपत्तीत तब्बल 20.9 लाख कोटींची वाढ झाली. त्यांची संपत्ती 58 टक्क्यांवरून 73 टक्क्यांपर्यंत पोहोचली, असे ‘ऑक्सफाम’च्या अहवालाचा हवाला देऊन या परिषदेत सांगण्यात आले. देशातील दारिदय़रेषेखालील 67 कोटी लोकसंख्येकडे फक्त 1 टक्का संपत्ती आहे, असे संजय शिंदे आणि शशी सोनवणे यांनी या परिषदेत सािंगितले. या परिषदेला मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आदी भागांतून ओबीसी, मराठा, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, हिंदू, मुस्लिम, बौद्ध आदी समाजांतील विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.