
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून साईकला कला क्रीडा मंच, पिंगुळी कुडाळ संस्थेच्या “घोकमपट्टी डॉट कॉम” या नाटकाला प्रथम तसेच शिवोली सेवा मंडळ, रत्नागिरी या संस्थेच्या “कॉफिन” या नाटकाने द्वितीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांकावर संकल्प कलामंच रत्नागिरीच्या “भर चौकात गांधी पुतळ्यासमोर” नाटकाला समाधान मानावे लागले. पहिल्या दोन पारितोषिक प्राप्त नाटकांची निवड अंतिम फेरीसाठी झाली आहे.
रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरीचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.
दिग्दर्शन प्रथम – केदार देसाई (घोकमपट्टी डॉट कॉम), द्वितीय – ओंकार पाटील (कॉफिन) प्रकाशयोजना: प्रथम – शाम चव्हाण ( बंदी क्रमांक सत्तावन्न त्र्याण्णव), द्वितीय – साईप्रसाद शिर्सेकर(कॉफिन) नेपथ्य: प्रथम – नंदकुमार भारती (भर चौकात गांधी पुतळ्यासमोर) द्वितीय – प्रवीण धुमक ( कॉफिन)रंगभूषा : प्रथम – आदिती दळवी (घोकमपट्टी डॉट कॉम) द्वितीय – दादा लोगडे (सुंदर मी होणार) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक पुरूष-केदार देसाई स्त्री- सुलेखा डुबळे (घोकमपट्टी डॉट कॉम) अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रे – दिप्ती कानविंदे (सुंदर मी होणार), सावनी परचुरे (सभ्य गृहस्थ हो), पुजा खानोलकर (प्रियांका आणि दोन चोर), रुपाली सावंत (नटरंग),ऋचा मुकादम (कॉफिन), शाम नाडकर्णी(मागच्या बेंचवरची मुलगी),विराज रांगणकर( चौकटीतलं राज्य), कृष्णकांत साळवी (भर चौकात गांधी पुतळ्यासमोर),ओंकार पाटील कॉफिन, विजय जोशी (सुंदर मी होणार).
स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी आणि मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे 21 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रा.रमेश कोटस्थाने, प्रवीण कुलकर्णी आणि वैशाली खरे यांनी काम पाहीले. सर्व विजेत्यांचे, नाट्यसंस्थांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आभिनंदन केले आहे.































































