मी पत्रकार परिषदांना घाबरत नव्हतो – डॉ. मनमोहन सिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मी सायलेंट पंतप्रधान होतो असे लोक म्हणतात; पण मी पत्रकार परिषदांना कधी घाबरत नव्हतो. प्रत्येक विदेश दौऱ्यानंतर मी नियमित पत्रकारांना सामोरे जात होतो, असा सणसणीत टोला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या ‘चेंजिंग इंडिया’ या पुस्तकाचे आज प्रकाशन झाले. यावेळी बोलताना मनमोहन सिंग म्हणाले, लोक म्हणतात मी सायलेंट पंतप्रधान होतो; पण या पुस्तकातच त्यांना उत्तर मिळेल. लोक मला ‘ऑक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ म्हणतात. त्याचबरोबर मी ‘ऑक्सिडेंटल फायनान्स मिनिस्टिर’ही होतो, असे ते म्हणाले. ‘मन की बात’ करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडेचार वर्षांनन एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. यावर मोदींचे नाव न घेता डॉ. मनमोहन सिंगांनी सणसणीत टोला लगावला. मी पंतप्रधान असताना पत्रकार परिषदांना घाबरत नव्हतो, असे ते म्हणाले.