
सामना प्रतिनिधी। नांदेड
नांदेड येथे एमडी मेडिसीन अभ्यासक्रमासाठी एका नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून देतो असे सांगत एका टोळक्याने डॉक्टरकडून २० लाख रुपये उकळल्याची घटना नांदेड सातारा येथे घ़डली. जुनेद अहेमद महम्मद खुर्शीद से या डॉक्टरचे नाव आहे.
खुर्शीद यांचे नांदेडच्या वजिराबाद भागातील डॉक्टर्स लेनमध्ये रुग्णालय आहे. खुर्शीद यांना एमडी मेडीसीन करायचे होते. यामुळे कृष्ण इन्स्टीटुट ऑफ सायन्स या संस्थेत एमडी मेडीसीन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळून देतो असे या टोळक्याने खुर्शिद यांना सांगितले. त्यानंतर सातारा येथील सचिन शर्मा, संजय सिंह उमेदसिंह, गणेश उर्फ सागर लोहाटे, आदीत्य अखिलेश सिंह, राजू, शिवाजी कुंभार आणि विजय दळवी यांनी खुर्शिदकडून २४ एप्रिल २०१८ रोजी २० लाख रुपये घेतले पण त्यांचा प्रवेश झाला नाही. यामुळे खुर्शिद यांनी याबद्दल पोलिसात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार ८ जणांविरुध्द भारतीय दंडविधानाच्या कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक मनोज पांडे करत आहेत.






























































