गावठाण, कोळीवाड्यांनाही क्लस्टरचा लाभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांना क्लस्टर योजनेमुळे दिलासा मिळाला असतानाच आता खऱ्या अर्थाने त्यास चालना मिळाली आहे. क्लस्टरचा लाभ गावठाण तसेच कोळीवाडय़ांनाही होणार असून त्यासाठी तेथे राहणाऱ्या रहिवाशांना लेखी संमती द्यावी लागणार आहे. दरम्यान क्लस्टर योजनेवर सर्वपक्षीय नगरसेवकांचे शिक्कामोर्तब झाले असून धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान कमीत कमी तोडफोड व जास्तीत जास्त पुनर्वसन हेच क्लस्टरचे मुख्य सूत्र राहणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली आहे.

क्लस्टर योजनेची माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक, वास्तुविशारद आणि विकासक यांची विशेष बैठक शुक्रवारी नागरी संशोधन केंद्र येथे आयोजित केली होती. यावेळी बोलताना महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी शासनाच्या धोरणानुसार तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच या योजनेची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले. सध्याच्या क्लस्टर योजनेतून गावठाण तसेच कोळीवाडय़ांचे क्षेत्र वगळले आहे. यावेळी बहुतांशी नगरसेवकांनी जुने गावठाण आणि कोळीवाडय़ांबाबतचे प्रश्न उपस्थित केले. त्यावर बोलताना आयुक्तांनी सद्यस्थितीमध्ये जुने गावठाण व कोळीवाडे या योजनेतून वगळण्यात आले असले तरी संबंधितांकडून लेखी संमती मिळाली तर जुनी गावठाणे आणि कोळीवाडे यांचा योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेता येईल असे सांगितले.

  • या योजनेची अंमलबजावणी करताना सीआरझेड, बफर झोन, ग्रीन झोन या सर्वांचा विचार केला असून पुठल्याही नियमाची पायमल्ली होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे.
  • वनविभागाच्या जागेत राहणाऱया लोकांचेही पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करताना 2014 पर्यंतचा कालावधी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
  • 1 जानेवारीपासून कोपरी, हाजुरी, राबोडी, किसननगर, लोकमान्यनगर आणि टेकडी बंगला या सहा ठिकाणांच्या योजनांचे सर्वेक्षण सुरू होणार आहे.

अनधिपृत इमारतींमध्ये राहणाऱयांनाही घरे
अनधिपृत बांधकामांच्या बाबतीत मालकी हक्क प्रस्थापित होणार नसला तरी अशा इमारतींमध्ये राहणाऱया नागरिकांचे 30-30 वर्षांच्या नियमाने 90 वर्षांचे लीज करण्यात येणार आहे. अनधिपृत इमारतींमध्ये किंवा अनधिपृत जागेवर उभारण्यात आलेल्या इमारतींमधील रहिवाशांनाही क्लस्टर योजनेमध्ये संरक्षण देण्यात आले आहे.

आयुक्त, नगरसेवकांचा नागरिकांशी संवाद
क्लस्टर योजनेबाबत अनेकांचे गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी तसेच या योजनेची माहिती देण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल तसेच सर्वपक्षीय नगरसेवक महापालिका क्षेत्रातील नगरसेवकांशी थेट संवाद साधणार आहेत. दरम्यान क्लस्टर योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी सगळ्याच पक्षांचे नगरसेवक आयुक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, अशी ग्वाही सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी दिली.