
सामना प्रतिनिधी । भोकरदन
गेल्या अनेक दिवसांपासून जालना जिल्ह्यातील भोकरदन जाफराबादविधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांना व सर्वसामान्यांना छेडण्याचे काम भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी चालविले असून या मतदारसंघातील शिवसेना संपविण्याचा हा खासदार दानवे यांचा कट असून तो मोडीत काढून खासदार दानवे यांची घराणेशाही संपवा, असा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड यांनी करत खासदार दानवे यांच्यावर टोला लगावला.
यावेळी रमेश गव्हाड पुढे म्हणाले की, आजवर कुणीही या तरुण पिढीने रझाकारी बघितली नसेल मात्र ती या मतदारसंघामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडून सुरू असल्याचे ते म्हणाले. शिवाय खासदार दानवे यांनी या मतदारसंघातील शिवसेना नष्ट करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळेच येथील सर्वसामान्य शिवसैनिकांना विविध खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून त्यांना बेआबरू करत त्रास देण्याचे काम देण्याचे काम दानवे करीत असल्याचा आरोपही यावेळी रमेश गव्हाड यांनी केला. यासह येथील पोलीस प्रशासना सर्व सर्वच प्रशासन खासदार दानवे यांच्या इशार्यावर नाचत असून हे सर्व प्रसाधने दानवे यांच्या खिशात असल्याचाही घणाघात यावेळी रमेश गव्हाड यांनी केला. शिवाय नोटाबंदी काळामध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलानेही मोठ्या प्रमाणावर नोटा बदली करून मोठा घोटाळा केला असून यामध्ये भाजपाचे सर्वच अनेक नेते यामध्ये सामील असून या नोटा बंदीमुळे देश वीस वर्षे मागे गेला असून देशाची आर्थिक घडी देखील बिघडल्याचे ते म्हणाले.
दरम्यान पंचायत समिती कार्यालयापासून निघालेल्या मोर्चास जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी जोश दाखवत प्रशासन व सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत जयभवानी… शिवाजी…शिवसेना जिंदाबाद….शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अगो बढो… अशा गगनभेदी घोषणा देत उपविभागीय अधिकारी परिसर दणाणून सोडला होता. तर शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले की, या मतदारसंघात खासदार दानवे यांनी चालवले षडयंत्र हे जास्त दिवस टिकणार नसून येणारा काळ हा शिवसेनेचाच असणार आहे. उद्या शिवसेनेचीच सत्ता येणार असे मत या मोर्चाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी व्यक्त केले. यावेळी या मोर्चा भोकरदन- जाफराबाद मधून शिवसैनिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. यावेळी मोर्चा एक भगवेमय स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले. या मोर्चाच्या वेळी शिवसैनिकांनी भाजपा सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करत भाजपा सरकारचा विरोध दर्शविला. दरम्यान आज २९ डिसेंबर शनिवार रोजी भोकरदन-जाफराबाद शिवसेनेच्या वतीने शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी येथील उपविभागीय कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुपारी १२ येथील पंचायत समिती मैदानावरून मोर्चास सुरुवात करण्यात आली व उपविभागीय अधिकारी कार्यालयावर कार्यक्रमाचा समारोप उपविभागीय अधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रस्तावित भाषण करत असताना सुरेश पाटील तळेकर, रामेश्वर जंजाळ, माधवराव हिवाळे, शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्कर मगरे, कैलास पुंगळे, नवनाथ दौड, किरण कोथळकर, मनीष श्रीवास्तव, संभाजीनगर येथून आलेले राजु आहेर यांनी खासदार दानवे यांच्यावर सडकून टीका करत भोकरदन- जाफराबाद मतदार संघांमध्ये खासदार दानवे यांची घराणेशाही व दडपशाही सुरू असल्याबाबत तसेच मतदारसंघातील वाळू तस्करी असेल अवैध दारूची विक्री असेल व विविध अवैध धंद्यांबाबत पाढा वाचून दाखवला. यावेळी यातील काही शिवसैनिकांनी भावुक होऊन शिवसैनिकांवर होत असलेला अन्याय अत्याचार याबाबत देखील पाढा वाचून खासदार दानवे यांच्यावर टीकास्त्र सोडले.



























































