कोपरगावात दुचाक्या चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगाव शहरामध्ये पोलीस आणि पत्रकार यांच्या दुचाकी चोरून चोरट्यांनी नव्या वर्षात पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे. शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरातील चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 4 मोटारसायकली चोरांनी चोरण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एका गाडीचे लॉक न तुटल्याने ती चोरता आली नाही. चोरांनी चक्क पोलीसांना व पत्रकारांना सोडले नाही. मंगळवारी एका पोलीसांची व पत्रकाराची मोटारसायकल चोरण्यात आली.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस ठाण्यात चोरी गेलेल्या गाडयांची तक्रार नोंदविण्यासाठी गर्दी झाली होती. तक्रार घेणाऱ्या पोलिसांनी तक्रारदारांचे नंबर लावून तक्रार घेण्याची वेळ आली. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर वर्षाच्या पहील्याच दिवशी दिवसभर पोलीस ठाण्यात आले नसल्याने तक्रारदारांची निराशा झाली. मंगळवारी शहरातील निवारा भागातुन पत्रकार मनोज जोशी यांचे भाऊ वृत्तपत्रविक्रेते मिलींद जोशी यांच्या मालकीची हिरो डिलक्स एमएच 17 बीएच 6302ही गाडी रात्री चोरीला गेली. तीनचारी कोकमठाण येथील पोलीस कर्मचारी सचिन बाळासाहेब पाटोळे यांच्या मालकीची बजाज पल्सर एमएच 17 बीपी 8862 ही गाडी रात्री चोरीला गेली.तर शिंगणापूर येथील कृष्णा आबासाहेब पवार यांची टीव्हीएस व्हीक्टर एमएच 17 सीबी 5259 या मोटार सायकली अज्ञात चोरटयांनी लांबवली. नवीन वर्षाच्या पाहील्याचा दिवशी एकाच रात्री चोरांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.