
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुस्थानी क्रिकेट संघातील सर्वाधिक गाजलेली गुरू-शिष्याची जोडी म्हणजे आचरेकर सर आणि सचिन तेंडुलकर. या जोडीने क्रिकेटला अनेक अनमोल क्षण दिले. सचिन तेंडुलकरला घडवणारे हात आज या जगात नाही. बुधवारी मुंबईमध्ये आचरेकर गुरुजींचे निधन झाले.
सचिन तेंडुलकरचे गुरू रमाकांत आचरेकर यांचे निधन
आचरेकर सरांमुळेच मी घडलो – सचिन तेंडुलकर
आचरेकर गुरुजींबाबत सचिनने आपल्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात सचिनने अशीच एक आठवण सांगितली आहे. सचिनला क्रिकेटच्या मैदानाचा देव बनवणारा देवमाणूस एकदा त्याच्यावर नाराज झाला होता आणि तोच किस्सा सचिनने सांगितला होता.
क्रिकेटच्या ‘किंगमेकर’ला सोशल मीडियाची श्रद्धांजली
काय आहे किस्सा?
सचिन सांगतो, आचरेकर सरांनी एकदा मला सामना खेळण्यासाठी पाठवले होते. परंतु मी आमचा सामना सोडून वरिष्ठ खेळाडूंचा सामना पाहण्यासाठी गेलो होतो. यामुळे सर नाराज झाले. त्यांनी मला एक झापडही मारली होती. त्यावेळी आचरेकर गुरुजी मला म्हणाले, ‘इतरांसाठी टाळ्या वाजवण्यात आनंद वाटण्यापेक्षा तुझ्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत’. आचरेकर सरांचा हा उपदेश माझ्या आयुष्यभर लक्षात राहिला आणि त्याप्रमाणे वागलोही.’



























































