
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुस्थानात सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेला घोटाळेबाज विजय मल्ल्या याला फरार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. सक्तवसुली महासंचालनालयाने (ईडी)ने दाखल केलेली याचिका मुंबई विशेष पीएमएलए कोर्टाने स्वीकारली आहे. या निर्णयामुळे विजय मल्ल्या याच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठीचा ईडीचा मार्ग मोकळा झाला असून मल्ल्या या निर्णयामुळे चांगलाच अडचणीत येणार आहे.
Special PMLA court declares Vijay Mallya a fugitive economic offender. His properties can now be confiscated by the government. pic.twitter.com/KHhzCaR50e
— ANI (@ANI) January 5, 2019
बँकाना चुना लावून किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असलेला 62 वर्षीय मल्ल्या हा 2016 मध्ये लंडनमध्ये फरारी झाला होता. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्येच हिंदुस्थान सरकारने मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनला विनंती केली होती. एप्रिल 2017 मध्ये स्कॉटलंड यार्डने मल्ल्याला अटक केली होती. परंतु तो जामिनावर सुटला होता. त्याच्या प्रत्यार्पणाचे प्रकरण 4 डिसेंबर 2017 पासून लंडनच्या न्यायालयात सुरू आहे. विजय मल्ल्या याच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी हिंदुस्थानच्या ताब्यात देण्यास लंडनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयाने मंजुरी दिली.



























































