
सामना प्रतिनिधी । मुंबई
देशात वाढत्या सायबर गुन्हय़ांना आळा घालता यावे आणि नागरिकांचे सर्व डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित व्हावे, त्यांना चालना मिळावी, यासाठी आज भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पाच सदस्यीय उच्च स्तरीय समितीची स्थापना केली. या समितीच्या प्रमुखपदी आधारकार्ड ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे नंदन निलेकणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती होणाऱया पहिल्या बैठकीनंतर 90 दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे.

























































