
सामना ऑनलाईन । लखनौ
मुस्लिमांना आर्थिक निकषांव स्वतंत्र आरक्षण जाहीर करा अशी मागणी बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी केली. मायावती यांचा आज 63 वा वाढदिवस असून याच अनुषंगाने आयोजिक एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.
युपीतील युतीने भाजपची झोप उडवली
मायावती म्हणाल्या, आमचा पक्ष धनवान आणि शेठजींची गुलामगिरी करत नाही. याबाबत तुम्ही बसपाचा इतिसाह उलगडून पाहू शकता. आम्ही आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना दिलेल्या 10 टक्के आरक्षणाचे स्वागत केले आहे. परंतु मुस्लिमांना आर्थिक निकषांवर स्वतंत्र आरक्षण जाहीर करावे. तसेच स्वातंत्र्याच्या काळात देशात सरकारी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांची संख्या 33 टक्के होती परंतु आता हे प्रमाण 2 ते 3 टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे मायावती यांनी ही आपली मागणी रास्त असल्याचे म्हटले.
भाजप-आरएसएसवर हल्ला
मायावती यांनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयं सेवक संघावर कडाडून टीका केली. भाजप आणि आरएसएस देशात धर्माच्या नावाने राजकारण करत असून सामान्य व्यक्तींनंतर आता देव-देवतांच्या जातीही सांगू लागले आहेत, असे मायावती यावेळी म्हणाल्या.


























































