गुजरात सलग नवव्यांदा चॅम्पियन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने सलग नवव्या वर्षी 14 ते 16 जानेवारी या कालावधीत अंधांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गुजरातने सलग नवव्यांदा चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. या स्पर्धेत आठ राज्याचे संघ सहभागी झाले होते. महाराष्ट्र – गुजरात यांच्यामध्ये जेतेपदाची लढत रंगली. गुजरातने प्रथम फलंदाजी केली. केतन पटेलच्या 127 धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर गुजरातने 239 धावा उभारल्या. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या लढतीत महाराष्ट्राला 130 धावाच करता आल्या. आनंदी संस्थेचे संचालक अर्जुन मुद्दा यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी संस्थेची माहिती दिली. बक्षीस वितरण सोहळ्याला सीसीआयचे अध्यक्ष आणि रमेश पोतदार हे उपस्थित होते.