शेवटच्या श्वासापर्यंत भगव्याशी प्रामाणिक राहू – अनिल जगताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

‘शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांमध्ये हिंदुत्वाचे स्फुल्लिंग चेतवले आहेत, त्यांनी संघर्षाची शिकवण दिली, त्यांनी दाखवलेल्या रस्त्याने मार्गक्रमण करायचे आहे. बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा भगवा झंझावात निर्माण करायचा आहे. त्यासाठी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकदिलाने काम करू’, अशी शपथ माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी घेतली.

शिवसेनाप्रमुखांच्या जयंती निमित्त जिल्हाभरातील शिवसैनिक आज एकवटले होते. शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहून शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या तैलचित्रासमोर शपथ घेतली. बीड जिल्ह्यात भगवा झंझावात निर्माण करू. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेत्रतवाखाली बीड जिल्ह्यातील भयावह दुष्काळात शेतकऱयांना आधार देऊ आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी गट तट बाजूला ठेऊन भगव्या ध्वजाखाली सर्व एकत्र येऊ शिवसेनाप्रमुखांना अपेक्षीत काम बीड जिल्ह्यात करून दाखवू. शिवसेनांप्रमुखाचे आशीर्वाद आपल्याला लाभले आहेत, जो पर्यंत श्वास आहे तोपर्यंत शिवसेनेशी प्रामाणिक राहू’, असा शब्द अनिल जगताप यांनी दिला.