ओम् नवमहाराष्ट्र, गावदेवीला जेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने दिंडोशी विधानसभा क्षेत्रात जिल्हास्तरीय द्वितीय श्रेणी पुरुष गट व महिला गट भव्य आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील पुरुष गटात गावदेवी क्रीडा मंडळ, पार्ले या संघाने अंतिम फेरीत स्वामी समर्थ क्रीडा मंडळ, मालाड या संघाचा पराभव करून आमदार चषक 2019 पटकावला. महिला गटाच्या अंतिम सामन्यात ओम् नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ, बोरिवली या संघाने तेजस्वी क्रीडा मंडळ, विलेपार्ले या संघाचा पराभव करून महिला ‘आमदार चषक 2019’ पटकावला.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते पार पडला. या वेळी नगरसेवक आत्माराम चाचे, सुहास वाडकर, विष्णू सावंत, पूजा चौहान, गणपत वारिसे, प्रदीप निकम, रूपेश कदम, संदीप जाधव, रमेश कळंबे, विजय गावडे, विद्या खानविलकर यांच्यासह खेळाडू व असंख्य क्रीडा रसिक उपस्थित होते.