ग्रामसडक योजनेअंतर्गत कुडाळसाठी निधी मंजूर, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कुडाळ

गेल्या चार वर्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन सुमारे 150 कोटींचा निधी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाला आहे.या वर्षी देखील पालकमंत्री दीपक केसरकर ,खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या प्रयत्नातून पुन्हा एकदा “मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यासाठी 21 कोटी 66 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून कुडाळ तालुक्यातील 8 रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.या रस्त्यांच्या कामांची लवकरच भूमिपूजने करून काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

राज्यातील न जोडलेल्या वाड्या – वस्त्या जोडण्यासाठी, तसेच दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दर्जोन्नती करणे, यासाठी “मुख्यमंत्री ग्रामसडक योजना” महाराष्ट्र शासनाने अंमलात आणली आहे. कुडाळ – मालवण विधानसभेचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ मालवण मधील अनेक रस्ते या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. 2 फेब्रवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार पुढील रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

यामध्ये पडवे गावराई धनगरवाडी रस्ता (ग्रा. मा. 113) यासाठी 4 कोटी 86 लाख रु, पिंगुळी काळेपाणी गोवेरी वेतोरे रस्ता (ग्रा. मा. 386) 2 कोटी 41 लाख रु, नेरूर जकातनाका गणेशवाडी माङयाचीवाडी रस्ता (ग्रा.मा. 359) 2 कोटी 48 लाख रु, पोखरण सुतारवाडी तळेवाडी धनगरवाडी रस्ता (ग्रा.मा. 84) 1 कोटी 66 लाख रु, झाराप कुंभारवाडी रस्ता (ग्रा.मा. 498) 1 कोटी 45 लाख रु, पिंगुळी मुसलमानवाडी भगतवाडी रस्ता (ग्रा.मा. 389) 2 कोटी 73 लाख रु, पाट कळ्याचा वड न्हावीवाडा रस्ता (ग्रा.मा. 342) 3 कोटी 51 लाख रु, कुपवडे फौजदारवाडी रस्ता (ग्रा.मा. 21,26) 2 कोटी 56 लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली