
सामना ऑनलाईन । मुंबई
जेष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे सोमवारी मुंबई येथील एलिजाबेथ रुग्णालयात निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. अनेक मराठी चित्रपट आणि मालिका यांमधून ते लोकप्रिय झाले होते. दूरदर्शनवरील हॅलो इन्स्पेक्टर या मालिकेतून ते लोकप्रिय झाले होते. त्यांचे पार्थिव दादर येथील “उमा “या निवासस्थानी आणल्यानंतर त्यांची पत्नी म्रुदुला भाटकर, मुलगा हर्षवर्धन यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. विनय येडेकर, प्रसाद कांबळी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.



























































