
सामना ऑनलाईन । जयपूर
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये महिलांबाबत केलेले आक्षेपार्ह विधान हार्दिक पांड्या, लोकेश राहुल आणि करण जोहर यांना चांगलेच महागात पडताना दिसत आहे. या प्रकरणी राजस्थानमधील जोधपुरमध्ये या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rajasthan: Case registered against Hardik Pandya, KL Rahul & Karan Johar in Jodhpur for comments made during Johar’s talk show in December last year. pic.twitter.com/eC19D3jxoP
— ANI (@ANI) February 6, 2019
डिसेंबर 2018 मध्ये करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंविरोधात बीसीसीआयने कारवाई देखील केली होती. या कारवाईनंतरही लोकांचा या तिघांवरील राग शांत झालेला नाहीये. यामुळे तक्रारीनंतर या तिघांवर नव्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एनआयए या वृत्तसंस्थेने दिलेल्या महितीनुसार तिघांविरोधात जोधपुरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































