नेरूरमध्ये एकांकीका स्पर्धेचा समारोप : दहा संघांचा सहभाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

ओमशिवकृपा कला-क्रिडा मंडळ नेरूर आयोजित एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत राज्यभरातील 10 संघांनी सहभाग घेतला असुन आज गुरूवार दि. 7 फेब्रुवारी रोजी समारोप होणार आहे.

श्री देव कलेश्‍वर मंदिर, नेरूर येथे तेथील ओमशिवकृपा कला-क्रिडा मंडळाच्या वतीने माघी गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव कलेश्‍वर मंदीराच्या रंगमंचावर एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन सिनेनाट्य अभिनेते राहुल वैद्य व नाट्य दिग्दर्शक अमित देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाट्य दिग्दर्शक सुभाष साऊळ, मंडळाचे अध्यक्ष दिलिप भांडारकर, उपाध्यक्ष गोपाळ नेरूरकर, सचिव प्रभात वालावलकर, प्रकाश नेरूरकर आदींसह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. निवेदन निलेश गुरव यांनी केले.

दरम्यान माघी गणेश जयंती उत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच शेखर गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. उपसरपंच समद मुजावर, उद्योजक पुरूषोत्तम प्रभु, देवस्थान सल्लागार उपसमिती नेरूरचे प्रदीप नाईक, तंटामुक्त समिती अध्यक्ष भास्कर गावडे, पोलिस पाटील गणपत मेस्त्री, राजु कलिंगण, प्रविण गुरव, श्याम नेरूरकर, हेमंत नेरूरकर, निलेश गुरव, मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.