मोदींच्या ‘मेहनती’ची नेटिझन्सनी उडवली खिल्ली, विरोधकही आघाडीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या आठवड्यात जम्मू-कश्मीर दौऱ्यावर गेले होते. या ठिकाणी त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला, अनेक प्रोजेक्टचे उद्घाटन केले व जगप्रसिद्ध डल झीलची चक्करही मारली. या ठिकाणी त्यांचा हात उंचावून अभिवादन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांसह राजकारण्यांनीही त्यांना ट्रोल केले होते.

‘ज्या बाजूला मोदी हात दाखवत आहे तिकडे कोणीही उपस्थित नव्हते’, असे जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले. यासह एकाच दिवशी मोदींनी वेगवेगळे कपडे घातल्यावरूनही ते ट्रोल झाले. मोदी ज्या ठिकाणी जातात तेथील पेहराव घालतात. जम्मू-कश्मीरमध्येही त्यांनी एकाच दिवशी विविध ठिकाणी भेट दिली आणि तेथील कपडेही घातले. मोदींच्या या मेहनतीवर नेटकऱ्यांनी नजर गेली आणि ते ट्रोल झाले.

एका दिवसात एवढे कपडे बदलने नक्कीच मेहनतीचे काम आहे, असे उपरोधिक ट्वीट नेटिझन्सनी केले आहे. नेटिझन्स तर नेटिझन्स राजकीय पक्षांनीही हे फोटो व्हायरल करत मोदींवर निशाणा साधला.

पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदींनी रंग बदलले, अशी टीका त्यांच्यावर अनेकदा झाली आहे. पण 3 फेब्रुवारीला जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर असताना त्यांनी एकाच दिवशी चार वेगवेळ्या रंगाचे कपडे बदलले आहेत, हेही स्पष्ट झालंय. अनेक नेटिझन्सनी पंतप्रधान मोदींची यावर खिल्लीही उडवली आहे, असे ट्वीट राष्ट्रवादीने केले आहे.