अण्णांचे आता मौनव्रत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राळेगणसिद्धी

मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सोडले असे सांगण्यात येत असले तरी अण्णांना लिखित असे काहीच मिळालेले नाही. म्हणूनच दोन दिवसांनंतर मौन आंदोलन करणार असल्याचे अण्णांनी सांगितले. एवढेच नव्हे तर सरकारने आश्वासन पूर्ण केले नाही तर निवडणूक आचारसंहिता काळात पुन्हा उपोषण करू असा इशाराही त्यांनी दिला.