Pulwama Attack Live- पुलवामा हल्ल्यात युरेनियम नायट्रेटचा वापर, प्राथमिक तपासात निष्पन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुलवामा

  • पुलवामा हल्ल्यात युरेनियम नायट्रेटचा वापर, प्राथमिक तपासात निष्पन्न
  • पुलवामा हल्ल्यासंबधी उद्या संसदेत सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक

  • त्रिपुरा सरकारकडून शहीदांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत.

  • पाकिस्तानातील हिंदुस्थानचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावले

  • राजनाथ सिंग व सत्यपाल सिंग यांची जम्मू कश्मीरमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक

  • राजनाथ सिंह यांनी दिला शहीद जवानांना खांदा

  • बडगाम लष्करी तळावर ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणा

  • थोड्याच वेळात जवानांचे पार्थिव दिल्लीला रवाना होणार
  • महाराष्ट्रातील दोन शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत करणार
  • गृहमंत्री राजनाथ सिंह, जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जवानांना श्रद्धांजली वाहिली

  • राजनाथ सिंग श्रीनगरला पोहोचले

  • पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना हिंदुस्थानने बजावले समन्स

  • पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन फिरतोय – मोदी
  • पुलवामा हल्ल्यातील गुन्हेगांरांना शिक्षा होणारच – मोदी
  • जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • जम्मू कश्मीरमध्ये बस स्थानकं, नवाबाद बक्षी नगर पीर, पाक्का दंगा, चन्नी हिम्मत जानीपूर, दोमाना आणि बाग-ए बहू या भागात संचारबंदी लागू

  • जम्मू कश्मीरमध्ये स्थानिक नागरिकांचे पाकिस्तानविरोधात आंदोलन

  • राजनाथ सिंह जम्मू कश्मीरला रवाना

  • आम्ही माफही करणार नाही आणि विसरणारही नाही – सीआरपीएफचे ट्विट

  • जवानांचे पार्थिव बडगाम येथील सीआरपीएफच्या तळावर ठेवण्यात आले आहेत.

  • केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह थोड्याच वेळात पुलवामाला रवाना होणार

  • दिल्लीतील पाकिस्तानच्या दुतावासाबाहेर सुरक्षा वाढवली

  • दुपारी दोन वाजता ग्लोबमास्टर जवानांचे पार्थिव घेऊन दिल्लीला रवाना होणार
  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तिन्ही दलाच्या प्रमुखांशी व सुरक्षा यंत्रणांशी चर्चा केली

  • दहशतवादी देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत – गांधी
  • ही वेळ राजकारण करण्याची नाही – गांधी
  • आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबासोबत आहोत
  • सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत आहेत – राहुल गांधी
  • राहुल गांधींना केला हल्ल्याचा निषेध

  • पाच संशयितांना घेतले ताब्यात
  • पुलवामात काही गावांमध्ये जवानांनी मारले छापे मारले
  • म्हणूनच आज हल्ल्यानंतर देखील आम्ही वंदेभारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला नाही
  • हल्ल्यांना न घाबरता विकासाची गती अधिक वाढवणार
  • देशाची सुरक्षा आणि देशाची समृद्धी या दोन स्वप्नांसाठी जवान बलिदान देतात
  • मनस्थिती गंभीर आहे, आक्रोश देशात आहे
  • एक मत, एक स्वर, एक दिशेन चाललो तर दहशतवाद टिकणार नाही
  • दहशतवादाविरोधात सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र होऊन लढावेच लागेल
  • 130 कोटी हिंदुस्थानी अशा हल्ल्यांना मुँह तोड़ जवाब देणार

  • असे हल्ले करून, कट रचून हिंदुस्थानला वेगळं करण्याचा विचार करत असे तर त्यांची ही चूक आहे
  • लढाई आम्ही जिंकण्यासाठी लढत आहोत
  • पण माझी विनंती देखील आहे की सर्व पक्षांनी एकत्र यावं, देश एक आहे

  • जे टीका करत आहेत त्यांच्या भावनांचा आदर करतो, त्यांना तसा अधिकार देखील आहे
  • जवानांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे

 

  • जे गुन्हेगार आहेत त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगावी लागतील
  • दहशतवाद्यांनी मोठी चूक केली आहे, याची जबर किंमत मोजावी लागेल– पंतप्रधान मोदी
  • संपूर्ण देश जवांनाच्या कुटुंबीयांसोबत आहे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
  • ज्या लोकांनी हे कृत्य केलं आणि ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्या सर्वांना याची किंमत चुकवावी लागेल, अशी कारवाई करणार- अरुण जेटली
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा उघड केला जाईल
  • पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेणार

  • तिथे जे घडलं त्याची सर्व माहिती दिली
  • परराष्ट्र मंत्रालयाकडून सर्व डिप्लोमॅटिक पाऊले उचलणार
  • शहिदांचे पार्थिव त्यांच्या घरी कसे पोहोचवले जातील याची माहिती दिली
  • जवानांना श्रद्धांजली वाहिली, त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला
  • 2 मिनिट शांतता पाळली
  • पुलवामा हल्ल्यासंदर्भात केंद्रीय संरक्षण समितीची बैठक बोलवली होती

  • संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि अरुण जेटली पत्रकारांशी संवाद साधत आहेत
  • थोड्याच वेळात सरकार बैठकीतील निर्णय सांगणार, साऱ्या देशाचे निर्णयाकडे लक्ष्य
  • मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक संपली, तासाभराहून जास्त वेळ चालली बैठक

  • दिल्लीत पालम विमानतळावर पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर शहीद जवानांचे पार्थिव त्यांच्या घरी पाठविण्यात येणार
  • शहीद जवान नशीर अहमद यांच्या कुटुंबीयांना शोक अनावर

  • सीआरपीएचे शहीद जवान जयमल सिंग यांच्या घरी शोकाकूल वातावरण

  • गाझियाबादच्या हिंडन हवाई तळावरून ग्लोबमास्टर विमाने श्रीनगरला रवाना
  • जवानांचे पार्थिव आणण्यासाठी हवाई दलाचे सी-17 विमाने श्रीनगरला जाणार

  • पालम विमानतळावर देणार श्रद्धांजली
  • जवानांना दिल्लीत श्रद्धांजली देण्यात येणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार
  • पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे उग्र आंदोलन, आता बदला घ्यायलाच हवा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

  • गुप्तचर यंत्रणांकडृून दिल्लीत हाय अलर्ट जारी
  • पाकिस्तानला धडा शिकवा – शहीद जवानाच्या वडिलांची मागणी

  • मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीला सुरुवात, मोठा निर्णय होणार

  • सात दिवसांपूर्वी हल्ल्याचा अलर्ट आला होता तेव्हा मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक घ्यायला हवी होती – गुलाम नबी आझाद
  • शहीद जवान पंकज त्रिपाठी यांच्या कुटुंबीयांना शोक अनावर

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द

  • सीआरपीएफचे महासंचालक बैठकीला उपस्थित
  • अर्थमंत्री अरुण जेटली देखील बैठकीला हजर
  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तीन्ही दलाचे प्रमुख बैठकीला हजर

  • मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीला सुरुवात, मोठा निर्णय होणार

  • गुरुदासपूर येथील शहीद जवान मनिंदर सिंग यांच्या घरी शोकाकूल वातावरण


ul>

  • संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज बैठकीला हजर राहणार
  • बैठकीसाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण परदेश दौऱ्याहून परत आल्या
  • बैठकीला लष्करप्रमुख बिपीन रावतही हजर राहणार
  • सकाळी 9 वाजता पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक
  • शहीद जवान रमेश यादवच्या घरी शोकाकूल वातावरण

  • संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन हिंदुस्थानात परतल्या

  • घटनास्थळाची सकाळची दृष्ये

 

  • जम्मूमध्ये इंटरनेट सेवा खंडीत

  • एनआयएचे पथक देखील काही वेळात पोहोचणार
  • गृहमंत्री राजनाथ सिंह थोड्याच वेळात घटनास्थळाचा आढावा घेणार
  • पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एएनआय)कडे सोपविण्यात आला आहे.
  • जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी आदिल अहमद दार याने हा हल्ला घडवून आणला
  • गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथून जाणाऱ्या जवानांच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 42 जवान शहीद झाले तर 45 हून अधिक जखमी झाले आहेत.