कश्मीरमध्ये पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला हिंसक वळण, कर्फ्यू लागू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील पुलवामामध्ये जवानांवर झालेल्या हल्ल्यावरून संपूर्ण देशात आक्रोश आहे. लोकांनी रस्त्यावर उतरून या हल्ल्याचा निषेध केला आहे. याचदरम्यान जम्मूमध्ये गुज्जर नगरमध्ये पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी घटनास्थळी गाड्यांना आग लावली. त्यानंतर शासनाने तिथे कर्फ्यू लावला आहे.

सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. जाळलेल्या गाड्यांची आगी विझवल्या जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुज्जर नगर हा मुस्लिम बहुल भाग आहे. इथे आंदोलक पोहोचले आणि हिंसा सुरू झाली.

पुलवामामध्ये सैन्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मू चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इन्डस्ट्रीने जम्मू बंदचा नारा दिला होता. या बंददरम्यान आंदोलक गुज्जर नगरमध्ये पोहोचले आणि हिंसा सुरू झाली.

जम्मूच्या पोलिसांनी शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्यासही सांगितले आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून शांततेचे आवाहन केले आहे.