Pulwama शिवसेनेची जोरदार निदर्शने; पाकिस्तानचा झेंडा जाळला, नकाशावर गोळ्या झाडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘अब नगारा बजही चुका है सैतानों का, नकशे पेसे नाम मिटा दो पाकिस्तान का, ‘दूध माँगोगे तो खीर देंगे, कश्मीर माँगोगे तो चीर देंगे’ अशा गगनभेदी घोषणाबाजी करीत शिवसेनेने आज शुक्रवारी क्रांतीचौकात जोरदार निदर्शने केली. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला आणि पाकिस्तानच्या नकाशावर गोळ्या झाडल्या.

कश्मिरात काल गुरुवारी झालेल्या भ्याड हल्ल्याचा देशभरात निषेध होत असून, आज संभाजीनगरात शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीचौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याला गोळीनेच उत्तर द्यायला पाहिजे, यासाठी शिवसैनिकांनी प्रतीकात्मक बंदुकी आणून पाकिस्तानच्या नकाशावर गोळ्या झाडल्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यावेळी बोलताना म्हणाले. जवान शहीद होत सरकार उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. त्यामुळे शिवसैनिकांना सीमेवर जायची आणि आत्मघातकी हल्ला करण्याची परवानगी द्यावी, असे दानवे म्हणाले. यावेळी महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महिला आघाडीच्या किरण शर्मा यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, तालुकाप्रमुख बप्पा दळवी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, सुशील खेडकर, मनपा गटनेते मकरंद कुलकर्णी, नगरसेवक मोहन मेघावाले, बन्सी जाधव, कमलाकर जगताप, सचिन खैरे, गजानन मनगटे, नितीन साळवी, सिद्धांत शिरसाट, मनोज गांगवे, सीताराम सुरे, नगरसेविका सीमा खरात मीना गायके, सीमा चंद्रनारायण, ज्योती पिंजरकर, उपशहप्रमुख शिवा लुंगारे, हिरा सलामपुरे, संतोष खेंडके, संदेश कवडे, चंद्रकांत इंगळे, राजेंद्र दानवे, दिग्विजय शेरखाने, अंबादास म्हस्के, ज्ञानेश्वर डांगे, अनिल जैस्वाल, संजय हरणे, रमेश बाहुले, संजय बारवाल, अनिल मुळे, महिला आघाडीच्या संपर्क संघटक कला ओझा, सहसंपर्क संघटक सुनीता आऊलवार, जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी, उपजिल्हा संघटक सुनीता देव, शहर संघटक आशा दातार, विद्या अग्निहोत्री, प्राजक्ता राजपूत, दुर्गा भाटी, उपशहर संघटक सुनंदा खरात, कविता सुरळे, मंजूषा नागरे, पद्मा तुपे, सीमा गवळी, शोभा शिनगीरकर, किरण शर्मा, राजश्री राणा, नलिनी महाजन यांच्यासह हिंमत पटेल, गणेश सुरे, रमेश सूर्यवंशी, विष्णू जाधव, सोमनाथ बोंबले, नंदू लबडे, रवींद्र कदम, अनिल नवले, पप्पू तुसांबड, वाल्मीक सोनवणे, संतोष खोंडकर, विश्वनाथ राजपूत, सचिन गोखले, सुनील विसपुते, व्यापारी आघाडीचे संजय लोहिया, विजय सूर्यवंशी, मनीष भारुका, रवींद्र लोढा, दलित आघाडीचे महेंद्र रगडे यांच्यासह सैनिकपूर्व प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.