
सामना प्रतिनिधी। पाटोदा
संपूर्ण पाटोदा परीसरा मध्ये दुष्काळामुळे तीव्र पाणी टंचाई असून आसपासचे सर्व पाणी साठे कोरडेठाक झाल्याने शहराला सौताडा येथील साठवण तलावातून टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र पाटोदा तहसीलदार यांनी अचानक नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी पत्र देऊन हा पाणी उपसा बंद करण्याचे आदेश दिल्याने एकाच खळबळ उडाली होती. या आशयाची बातमी पत्रकार कोल्हे यांनी प्रकाशित केली होती. मात्र बातमीला तहसीलदार यांनी निराधार ठरवत कोल्हे यांच्यावर आकस बुद्धीने गुन्हा दाखल केला विशेष म्हणजे या आदेशाचे पत्र तहसीलदार यांनी स्वतःच नगरपंचायतला दिले असतानाही हा गुन्हा दाखल करण्यात आला.
पाटोदा तहसीलदार यांनी सूड बुद्धीने पत्रकार कोल्हे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा पाटोदा येथील सर्व पत्रकारांनी निषेध केला असून ऐन दुष्काळी परिस्थितीत अकार्यक्षम ठरलेल्या व परिस्थिती चे गांभीर्य नसलेल्या पाटोद्याच्या तहसीलदार यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून पत्रकार कोल्हे यांच्यावरील खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी सोमवार रोजी पाटोदा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लक्षणिक उपोषणास बसले आहे.
































































