पाण्याच्या प्लँट आणि पिठाच्या गिरणीसाठी चोरून वीज वापरली, सरपंच आणि ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

औसा तालुक्यातील चिंचोली काजळे येथील सरपंच मोहन आप्पाराव सूर्यवंशी व ग्रामसेवक निलेश फुलचंद पाटील यांच्याविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात सुरू केलेल्या आर ओ प्लँट आणि पिठाच्या गिरणीसाठी चोरून वीज वापरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

या वीज चोरी प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गणेश दिगंबरराव जमाले सहाय्यक अभियंता फिरते पथक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित धाराशिव यांनी तक्रार दाखल केली. 3 डिसेंबर 2018 रोजी फिर्यादी गणेश जमाले यांच्या नेतृत्वाखाली फिरत्या पथकाने काजळे चिंचोली येथे भेट देऊन पाहणी केली. या पथकांमध्ये विश्वास सोमशेखर बुडत कनिष्ठ अभियंता योगेश चैत्राम बोरसे सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी यांचा समावेश होता.

काजळी चिंचोली येथे सरपंच मोहन आप्पाराव सूर्यवंशी आणि ग्रामसेवक निलेश फुलचंद पाटील यांच्या अधिपत्याखालील ग्रामपंचायतीच्या आरा ओ फिल्टर पाणी प्लँट व पिठाच्या गिरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या वीज जोडणीची तपासणी केली असता आकडे टाकून वीज घेतल्याचे निदर्शनास आले. मागील चार महिन्यापासून 2469 युनिटची चोरी करण्यात आल्याचे सिद्ध झाले. वीज वापराचा जोडभार 7.869 के डब्ल्यू असल्यामुळे त्याची तडजोडीची रक्कम एक लाख दहा हजार रुपये होते. मी चोरी केली म्हणून विद्युत कायदा 2300 कलम 135 अन्वये सरपंच मोहन आप्पाराव सूर्यवंशी व ग्रामसेवक निलेश फुलचंद पाटील त्यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल अडीच महिन्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.