शिवसेना भाजप युतीची घोषणा; कोण किती जागा लढणार, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray-amit-shaha
फाईल फोटो: पीटीआय

सामना ऑनलाईन । मुंबई

 

  • शिवसेना, भाजपची संयुक्त पत्रकार परिषद संपली
  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अमित शहांनी अभिवादन केले
  • दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकदिलाने, एकजुटीने काम करून विजय मिळवतील
  • विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत युतीचाच विजय होणार
  • युती ही फक्त राजकीय नसून सिध्दांताची युती आहे
  • लोकसभेत युती 45 जागांवर विजय मिळवेल अमित शहा यांना विश्वास
  • आमच्यात असलेले गैरसमज आणि मतभेद दूर झाले आहेत
  • चांगल्यावाईट प्रसंगात शिवसेनेने भाजपला साथ दिली आहे
  • भाजपचा शिवसेना सर्वात जुना मित्र पक्ष- अमित शहा

  • कटु अनुभव आणि गैरसमज टाळण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करणार
  • देश आणि राज्याच्या हितासाठी काही गैरसमजांमुळे अयोग्य आणि अविचारी लोकांच्या हातात सत्ता जाऊ देणार नाही
  • स्थानिकांचा विरोध असल्याने नाणारमध्ये प्रकल्प नको, जनतेचा पाठिंबा असलेल्या ठिकाणी प्रकल्पाला सहमती
  • राममंदिर ही देशाची ओळख, लवकरात लवकर राममंदिर निर्माण करण्यासाठी एकमत
  • हिंदुत्त्व आणि राममंदिराच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांचे एकमत
  • शेतकऱ्यांच्या समस्या आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्या ताताडीने सोडवण्याची गरज
  • शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, हिंदुस्थान लेचापेचा नाही पाकिस्तानला लवकरच कळेल
  • पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धाजंली
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आपण वेळोवेळी सल्ला घेतो- मुख्यमंत्री
  • राज्यात आणि देशात आमच्या सरकारने चांगले काम केले असल्याने पुन्हा रालोआच सत्तेत येणार
  • दोन्ही पक्षांत कोणतेही मतभेद नसून व्यापक जनहितासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • सत्तेत आल्यानंतर दोन्ही पक्ष पदे समानतेने वाटून घेतील
  • विधानसभा निवडणुकीसाठी मित्रपक्षांना काही जागा सोडून राहिलेल्या जागा दोन्ही पक्ष समानतेने वाटून घेतील
  • लोकसभेसाठी शिवसेना 23 तर भाजप 25 जागा लढवणार
  • सत्ता आणि पदांसाठी दोन्ही पक्षांची चर्चा नसून व्यापक जनहितासाठी घेतला युतीचा निर्णय
  • जनतेचा पाठिंबा असणाऱ्या ठिकाणीच प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेणार
  • नाणार प्रकल्पासाठी स्थानिकांच्या बाजूने उभे राहणार
  • कर्जमाफीसाठी तातडीने प्रक्रियेला सुरुवात करणार
  • कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देणार
  • लोकसभा विधानसभा एकत्र लढण्याबाबत दोन्ही पक्षांचे एकमत
  • अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी दोन्ही पक्ष आग्रही
  • शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्यासाठी काम करण्याचा निर्णय घेत दोन्ही पक्षांनी युती करण्याचा निर्णय घेतला
  • राष्ट्रीय विचारांच्या पक्षांनी एकत्र येण्याच्या जनभावनेचा दोन्ही पक्षांनी आदर केला
  • हिंदुत्त्ववादाच्या विचारामुळे दोन्ही पक्ष 25 वर्षे एकत्र -मुख्यमंत्री
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन
  • अमित शहा यांनी शिवसेनाप्रमुख बाळासोहब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला
  • शिवसेना, भाजपचे अनेक नेते पत्रकार परिषदेसाठी उपस्थित
  • हॉटेल ब्लू सीमध्ये चौघे नेते पोहचले
  • वरळीच्या हॉटेल ब्लू सीमध्ये होणार पत्रकार परिषद
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीतून निघाले
  • मातोश्रीवर झाली चर्चा; पत्रकार परिषदेसाठी नेते रवाना
  • थोड्याच वेळात पत्रकार परिषदेस होणार सुरुवात
  • शिवसेना नेते खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, दिवाकर रावते,अनंत गीते, सुभाष देसाई  हे देखील उपस्थित
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गिरीश बापट बैठकीला उपस्थित
  • मातोश्रीवर युती संदर्भात चर्चा सुरू
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांचे केले स्वागत

police car

  • अमित शहा ‘मातोश्री’वर पोहोचले
  • अमित शहा ‘मातोश्री’च्या दिशेने रवाना
  • अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली
  • अमित शहा सोफिटेल हॉटेलवर पोहोचले
  • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मुंबईत दाखल
  • शिवसेना-भाजपच्या युतीचे काय होणार याकडे देशाचे लक्ष