
सामना प्रतिनिधी । लातूर
औसा तालुक्यातील मौजे उंबडगा बु. येथील सरपंच राम केशव सितापे यांना घरात घुसून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरपंच राम सितापे यांनी 14 फेब्रुवारी रोजी औसा पोलीस ठाण्यात बालाजी दत्तू सरवदे याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. याचाच राग येऊन 16 फेब्रुवारी रोजी रात्री बालाजी दत्त सरवदे हा त्यांच्या घरात घुसला व शौच खड्ड्याच्या धनादेश माझ्या नावावर का देत नाहीस म्हणून अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.





























































