
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबई ओला-उबेरप्रमाणे आता एसटीमध्येही ‘जीपीएस’ यंत्रणा बसवण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांना ‘लाल परी’चे लोकेशन समजणार आहे. एसटी स्थानकांकर लाकलेल्या डिजिटल बोर्डकर एसटीची निश्चित केळ समजणार आहे. शिवाय मोबाईल ऍपच्या माध्यमातूनही एसटी कुठे आहे हे समजणार आहे. गाडीचा वेग आणि चालकाने एखादा स्टॉप चुकवल्यास त्याचीही माहिती मिळेल. या उपक्रमासाठी महामंडळाने 35 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.






























































