आपल्या देशाची लायकी काय ते मी अनुभवलंय, पाकिस्तानी अभिनेत्रीची व्हिडीओ पुन्हा व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

इरफान खानसोबत ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटात काम केलेली प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पाकिस्तानची जगात लायकी काय आहे हे मला कळलंय, ते मी अनुभवलंय असं म्हणत सबा या व्हिडिओमध्ये रडताना दिसते. पुलवामा हल्ल्यानंतर आता सबाचा हा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सबाने काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी चॅनेलला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने पाकिस्तानींना जगात कशी वागणूक दिली जाते, पाकिस्तानींची लायकी काय आहे याबाबत सांगितले होते. ‘आपण पाकिस्तानी असल्याने पाकिस्तान झिंदाबादचा नारा देतो. पण जेव्हा आपण दुसऱ्या देशात जातो. तेव्हा आपण पाकिस्तानी असल्यामुळे ज्या प्रकारे आपली तपासणी होते ते सांगूही शकत नाही. एकदा एका चित्रपटासाठी परदेशात गेले होते. तेव्हा चेकिंगच्यावेळी माझ्यासोबत असलेल्या हिंदुस्थानी क्रूची फार तपासणी न करता त्यांना पाठवून दिलं. मला मात्रं त्यांनी बसवून ठेवलं. मी पाकिस्तानी म्हणून माझी ज्या प्रकारे तपासणी झाली ते फार लज्जास्पद होतं’, असं सांगत सबा ढसाढसा रडली आहे.