
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली आहे. देशातील शेतकऱ्यांनी पाकिस्तानला टॉमेटो निर्यात करणेच बंद केले. यावर एका पाकिस्तानी पत्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात तो तोबा तोबा म्हणत टॉमेटो बंद केल्याचं उत्तर अणुबॉम्बने देऊ अशी हिंदु्स्थानला धमकी देत असल्याचं पाहायला मिळतयं. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून लोकांनी या पाकिस्तानी पत्रकाराला ट्रोल केलं आहे.
पण त्याच्या या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच खिल्ली उडवली असून ज्याला नीट उच्चारही करता येत नाही तो अणुबॉम्बच्या धमक्या देत असल्याचं म्हटलं आहे. तर ही लोकं येतात कुठून अशी भन्नाट प्रतिक्रियाही एकाने दिली आहे. तर काहींनी त्याच्या व्हिडीओखाली मजेशीर फोटो टाकून जोक्स शेअर केले आहेत.

























































