
सामना प्रतिनिधी । धाराशिव
कळंब तालुक्यातील शिराढोण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या तथा भारतीय जैन संघटनेच्या जिल्हाप्रमुख कांचनमाला संगवे यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संगवे यांचे पक्षात स्वागत केले. संगवे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कळंब तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.
कळंब तालुक्यातील शिराढोण गटाच्या माजी जि. प. सदस्या तथा भारतीय जैन संघटनेच्या जिल्हाप्रमुख कांचनमाला संगवे यांनी सोमवारी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई येथे मातोश्रीवर सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कांचनमाला संगवे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले तसेच शिवसेनेत प्रवेश दिला. यावेळी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते विश्वनाथ नेरुरकर, शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख कैलास पाटील, धाराशिवचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, रामभाऊ पडवळ, तालुकाप्रमुख सतिश सोमानी, तुळजापूर तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संजय देशमुख, संजय निंबाळकर, भिमा जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
कांचनमाला संगवे यांच्यासह शिराढोणचे माजी सरपंच प्रताप पाटील, माजी उपसरपंच आयुबभाई कुरेशी, उत्कर्ष संगवे, राजाभाऊ कापसे, श्रीहरी माळी, अबरारखाँ पठाण, खय्युम कुरेशी आदी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्ंयासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कांचनमाला संगवे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे कळंब तालुक्यातील शिराढोण गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे.

























































