जवानांच्या शौर्याची आणि त्यांच्या हौतात्माची गाथा सांगणाऱ्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी नवी दिल्लीत उद्घाटन करण्यात आले.
स्मारकाच्या उद्घाटनावेळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते.
सुमारे 40 एकर परिसरात असलेल्या या स्मारकाच्या निर्माणासाठी 180 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये स्मारकाचे काम सुरू करण्यात आले होते. वर्षभरात स्मारक पूर्ण झाले आहे.
स्मारकात चार चक्रे बनवण्यात आली आहे. अमर, वीरता, त्याग आणि रक्षक अशी ही चार चक्रे आहेत.
स्मारकांच्या भिंतीवर 29,942 शहिदांची नावे कोरण्यात आली आहेत. त्यात 1962 हिंदुस्थान-चीन युद्ध, 1965,1971 हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध, श्रीलंकेतील शांतीसेनेचे जवान आणि कारगिल युद्धातील शहिदांचा समावेश आहे.