टेंभुर्णीजवळ अपघातात तीन ठार; दोन जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । टेंभूर्णी

भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तीन जण जागीच ठार झाले. तर दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी रात्री 7.45 वाजता पुणे-सोलापूर रोडवर शिराळ पाटीजवळ झाला. या अपघातात अलका नवनाथ गायकवाड (वय 45), नवनाथ सगाजी गायकवाड (वय 55), सूरज किरण कांबळे (वय 10) अशी मृतांची नावे आहेत. तर गीरज उर्फ रिंग्या किरण कांबळे व अक्षय हे दोघे जखमी झाले. हे पाच जण दुचाकीवरुन आलेगाव येथीलशिराळ नजीकच्या सुर्ली येथील मुक्कामाच्या ठिकाणी येत असता पुण्याकडून टेंभूर्णीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुटाकीला धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या गिरज याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.