देशभक्तीला उधाण… हवाई दलावर अभिनंदनाचा वर्षाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी हिंदुस्थानी सैनिकांनी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांचा आत्मार्पण दिन निवडला आणि पुलवामा घटनेत वीरगती प्राप्त झालेल्या जवानांचे तेरवी श्राद्ध ‘हवाई हल्ल्या’द्वारे केले. हे सावरकरांच्या शक्तिसंपन्न आणि शस्त्रसज्ज होण्याच्या आवाहनाचे द्योतक आहे.
– डॉ मोहन भागवत,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक

हिंदुस्थानचा हवाई हल्ला ही नव्या चेंडूची नवी खेळी आहे. शांततेच्या काळात शेजारच्या देशातील दहशतवाद्यांच्या कॅम्पवर हल्ल्यासाठी हवाई दलाचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे. या हल्ल्याकडे जे कोणी राजकीय भिंगातून पाहतात त्यांनी ‘कारगील’ घडूनही अटलबिहारी वाजपेयी हे ‘आघाडी’मुळे पुन्हा सत्तेवर आले होते हे विसरू नये. ओमर अब्दुल्ला-नेते नॅशनल कॉन्फरन्स

हिंदुस्थानी हवाई दलाच्या पायलटस्ना माझा सॅल्यूट.– राहुल गांधी, अध्यक्ष, काँग्रेस

हवाई दलाच्या हल्ल्याबद्दल परस्परविरोधी बातम्या येऊ लागल्या आहेत. हिंदुस्थानचे सरकार म्हणतेय की, दहशतवाद्यांच्या कॅम्पांवर बॉम्बचा वर्षाव करण्यात आला. तर पाकिस्तान सांगतोय की, पाकिस्तानला चाहूल लागताच हिंदुस्थानची लढाऊ विमाने चपळाईने माघारी फिरली. थोडक्यात, दोन्ही बाजूंचा हेतू साध्य झाला आहे.- मेहबुबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री, जम्मू-कश्मीर

‘आयएएफ’ म्हणजे ‘इंडियाज् अमेझिंग फायटर्स!’ जयहिंद!!– ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

हिंदुस्थानी हवाई दलाच्या शौर्याला मी सलाम करतो. त्यांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर चढवलेला हल्ला अभिमानास्पद आहे.
– अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली

हवाई दलाची ही कामगिरी महान आहे. तुम्ही पुलवामासारखे दहशतवादी हल्ले कराल आणि हिंदुस्थान ते खपवून घेईल हे कसे शक्य आहे? पाकिस्तानचे डोळे उघडणारा संदेश हवाई हल्ल्यातून व्यवस्थित पोहोचला आहे.- कॅप्टन अमरिंदर सिंग, मुख्यमंत्री, पंजाब

‘न्यू इंडिया’ची इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयाचे दर्शन हवाई दलाच्या कामगिरीतून जगाला घडले आहे. दहशतवादी कारवाया आम्ही खपवून घेणार नाही आणि त्यामागील सूत्रधार, गुन्हेगार आणि आश्रयदात्यांना आम्ही सोडणार नाही हेच हिंदुस्थानने दाखवून दिले आहे.- अमित शहा, अध्यक्ष, भाजप

‘मी सकाळपासून पाहत होते. आपले लष्कर खूपच तयारीचे आणि शक्तिशाली आहे हे पाहून मला आनंद झाला. लष्कर आहे म्हणून आपला हिंदुस्थान आहे. आपण या देशात राहतो आणि खूपच भाग्यशाली आहोत.’- लता मंगेशकर

‘हिंदुस्थानी हवाई दलाबद्दल मला अत्यंत आदर आहे…जय हो !!!’- सलमान खान

‘दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त करणाऱया हिंदुस्थानी हवाई दलाचा मला अभिमान आहे. त्यांच्या हद्दीत घुसून मारले.’
– अक्षय कुमार

‘भारतमाता की जय…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सॅल्यूट करायला प्रारंभ करण्यास आजचा दिवस उत्तम आहे.’ – अनुपम खेर

‘हिंदुस्थानी हवाई दलाचा मला अत्यंत अभिमान आहे. हवाई दलाच्या शूर पायलटस्ना सलाम’ – महेश बाबू

‘देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी हवाई दलाने केलेल्या स्फूर्तीदायक कामगिरीला सलाम. त्यांच्या सुरक्षेसाठी आपण प्रार्थना करूया. जय हिंद…’ – संजय दत्त

‘‘ब्राव्हो इंडिया!’’ – रजनीकांत

‘हिंदुस्थानला त्यांच्या शूरसैनिकांबद्दल अभिमान आहे. पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून आपले 12 वीर सुरक्षित परतले…त्यांच्या पराक्रमाला माझा सलाम’ – कमल हसन

सर्जिकल स्ट्राइकवर आधारित ‘उरी’ चित्रपटातील कलाकार यामी गौतम, विवेक ओबेरॉय, सोनू सूद, सोनाक्षी सिन्हा आणि सुनील शेट्टी यांनीही ट्विटरवर ‘जय हिंद’ अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.