
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून हिंदु्स्थानच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक करत जैश ए मोहम्मदचे तळचं उध्वस्त केले. या हल्ल्यानंतर बालाकोट, मुजफ्फराबाद, चकोटी ही पाकिस्तानमधील ठिकाणं जगाच्या नकाशावर झळकू लागली आहेत. यातील मुजफ्फराबाद आणि चकोटी या भागांचा तसा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध नाही. पण बालाकोट या गावाला मात्र 200 वर्षांचा रक्तरंजित इतिहास आहे. उत्तर प्रदेशमधील बरेली येथील सय्यद अहमद बरेलवी (1786-1831) यानेच बालाकोटमध्ये आधुनिक जगातल्या जिहादचा पाया रचला .
उत्तर प्रदेशमधील बरेलव्ही गावात सय्यदचा जन्म झाला. कट्टरपंथीय असलेला सय्यद हा तत्कालिन माओ MAO आणि सद्याच्या अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीचा संस्थापक होता. संपूर्ण आशियाई देशात इस्लामचा प्रसार व्हावा अशी त्याची दुर्दम्य इच्छा होती. हिंदुस्थानमध्ये मुस्लीम राजांचा झालेला अस्त आणि मराठा,शीख, आणि जाट यांच्या वाढत्या प्रभावामुळे आणि ब्रिटीशांच्या उदयामुळे सय्यद अस्वस्थ होता. जगभरात इस्लाम हाच एकमेव धर्म असावा यासाठी 1831 साली तो बरेलहवी येथून बालाकोटमध्ये आला होता.तेथून पाकिस्तानस्थित खैबर पख्तुनवा (KP) मध्ये त्याने आपले बस्तान बसवले. इस्लामच्या नावावर खैबर पख्तुनवा येथील नागरिक व शेजारी असेलला अफगाणिस्तान आपल्याला साथ देईल असा सय्यदला विश्वास होता. याचाच फायदा घेत त्याने शीख राज्यकर्ते महाराजा रणजित सिंग यांच्या कारभारावर नाराज असलेल्या नागरिकांची जमावाजमव करण्यास सुरुवात केली. अशा पद्धतीने त्याने पाटण्यातील 2,500 मु्स्लीम नागरिकांना आपल्या गोटात सहभागी केले. त्यांना मुजाहिदीन असे नाव देण्यात आले. नंतर सिंध प्रांतमार्गे तो पेशावर , क्वेट्टा, कंदहार आणि काबूलमध्ये त्याने प्रवेश केला. बालाकोट येथे पोहचण्याआधी सय्यद पाच वर्ष वेगवेगळ्या भागात फिरत होता. त्यानंतर वयाच्या 46 व्या वर्षी त्याने तिसरा निकाह केला.
नंतर त्याने राजस्थानचे नवाब टोंक यांना एक पत्र लिहले. त्यात बालाकोट हा सर्वात सुरक्षित भाग असून त्याच्या चारही बाजूला असलेल्या डोंगरदऱ्यांमुळे हा भाग समृद्ध असल्याचे व काफीरांना (हिंदू) इथपर्यंत पोहचणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर सय्यदने येथे जिहादी तयार करण्याचे केंद्रच सुरू केले. जे आजतागयत सुरू होते. पण हिंदुस्थानच्या हवाई दलाने या जिहादी तळांनाच उडवून दहशतवाद्यांना खुले आव्हान दिले आहे.



























































